
मीन राशीतील या दोन ग्रहांच्या युतीचा शुभ-अशुभ प्रभाव काही राशींवर पडेल.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तन करतो. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. सध्या नवग्रहांमधील कर्मफळदाता शनी मीन राशीत विराजमान असून बुधदेखील मीन राशीत विराजमान आहे. मीन राशीतील या दोन ग्रहांच्या युतीचा शुभ-अशुभ प्रभाव काही राशींवर पडेल. दरम्यान, १२ राशींपैकी नक्की कोणत्या राशींवर शनी-बुधाचा शुभ प्रभाव पडेल हे आपण जाणून घेऊ
*शनी-बुधाचा तीन राशींवर जबरदस्त प्रभाव….*
*मिथुन (Gemini)*
शनी-बुधाचा सकारात्मक प्रभाव मिथुन राशीच्या व्यक्तींवर पडेल. या काळात तुमचे भाग्य चमकेल. मनातील सर्व मनोकामना पूर्ण पडतील. आयुष्यात नवनवीन गोष्टी साध्य कराल. नव्या गोष्टी आवडीने शिकाल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.
*धनु (Sagittarius)*
शनी-बुधाचा शुभ प्रभाव धनु राशींच्या आयुष्यावरही जाणवेल. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील वाईट विचार दूर होतील. स्वतःचा वेळ चांगल्या कामात घालवाल. केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. युष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.
*सिंह (Leo)*
सिंह राशीसाठीही शनी-बुधाचा प्रभाव खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील वाईट गोष्टी तुमच्यापासून दूर होतील. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. समाजात मान-सन्मान प्राप्त कराल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.