पुणे- सध्या सगळीकडेच डिजिटली व्यवहार केला जातो. २०१६च्या नोटबंदी नंतर कॅशलेस व्यवहारांकडे बऱ्याच जणांचा कल गेला. त्यातून यूपीआयसारख्या डिजिटल पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. याच डिजिटल व्यवहारांसंदर्भात काही आकडेवारी आली आहे. ज्यामध्ये मुंबई-पुण्याने देशात सर्वाधिकपणे डिजिटल व्यवहार केल्याचे समोर आले आहे.
सर्वाधिक डिजिटल व्यवहार कुठे झाले
सर्वाधिक डिजिटल व्यवहार होणाऱ्या पाच महानगरांमध्ये मुंबई, पुण्याचा समावेश आहे. यामध्ये बंगळूरू पहिल्यावर असून चेन्नई व नवी दिल्लीचा ही समावेश आहे. तसेच डिजिटल व्यवहारांमध्ये पुण्याने मागील वर्षी २०२२मध्ये मोठी मजल मारली आहे. देशात सर्वाधिक २.९ कोटी डिजिटल व्यवहार बंगळूरुत झाले. तसेच नवी दिल्लीत १.९६ कोटी, मुंबईमध्ये १.८७ कोटी, तर पुणे आणि चेन्नईत अनुक्रमे १.५, १.४३ कोटींचा डिजिटल व्यवहार झाला आहे.
वर्ल्डलाइन इंडिया काय म्हणत?
यूपीआय संलग्न व्यवहारांच्या लोकप्रियेतेमुळे देशात डिजिटल व्यवहारांची संख्या वर्षभरात लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी डिजिटली १४९.५ लाख कोटीं रुपयांचे व्यवहार झाले.
वर्ल्डलाइन इंडियाचे मुख्य कार्यकारी आधिकारी रमेश नरसिहमन म्हणाले की, डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत सर्वत्रच खूप झपाट्याने प्रगती सुरू आहे, मागील वर्षी पाचही महानगरांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली.