धूतूम गावातील प्रकल्पग्रस्तांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – सरपंच सुचिता ठाकूर..

Spread the love

उरण दि २२(विठ्ठल ममताबादे )

उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या इंडियन ऑइल टँकिंग अर्थातच इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स या कंपनीने धुतुम गावातील गोरगरीब जनतेवर, प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य न देता कंपनीने परप्रांतीयांची भरती केली आहे. मात्र येथील स्थानिक भूमीपुत्र,ग्रामस्थ हा अन्याय अजिबात सहन करणार नाही. न्याय हक्कासाठी आम्ही सर्व एकजूटीने लढू.कपनी प्रशासनाने, स्थानिक भूमीपुत्रांना,प्रकल्पग्रस्तांना त्वरीत कामावर घ्यावे अन्यथा तीव्र लढा उभारावे लागेल असा आक्रमक ईशारा धुतुम ग्रामपंचायतचे सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामस्थांनी आयओटिएल प्रशासनाला दिला आहे.आमरण उपोषणाचा दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी तिसरा दिवस होता.

या उपोषणाची दखल घेत उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांनी उपोषण स्थळी उपोषण कर्त्यांची भेट घेतली व त्यांची समस्या जाणून घेतली. समस्या जाणून घेउन त्यांनी कंपनी प्रशासनासोबत त्वरित बैठक लावली.आयओटीएल कंपनी प्रशासनाचे अधिकारी यांनी सर्वप्रथम उपोषण कर्त्यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. व त्यानंतर तहसीलदार यांनी कंपनीत लावलेल्या बैठकीला उपस्थिती लावली.दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता आयओटीएल कंपनीत तहसीलदार उद्धव कदम यांनी लावलेल्या बैठकित तहसीलदार उद्धव कदम, आयओटीएल कंपनी प्रशासनाचे हेड टर्मिनल भूपेश शर्मा, ऍडमिन मॅनेजर संदीप काळे, ऑपरेशन मॅनेजर सतिश म्हात्रे, असिस्टंट मॅनेजर प्रफुल्ल म्हात्रे उपस्थित होते.

तर ग्रामस्थ व धुतुम ग्रामपंचायतचे प्रतिनिधी म्हणून सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर, रविनाथ ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, सुहास ठाकूर, प्रकाश ठाकूर यांनी बैठकीत सहभाग घेतला.यावेळी ग्रामपंचायत धुतुमचे सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील व इतर सदस्यांनी बैठकीत आक्रमक भूमिका घेत स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त यांची बाजू हिरीरीने मांडली. व जोपर्यंत स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांना कामावर घेत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहिल अशी भूमिका घेतली.त्यामुळे तहसीलदार, कंपनी प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन किंवा योग्य तो प्रतिसाद कंपनी प्रशासनाकडून मिळाला नाही. त्यामुळे हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

स्थानिक भूमीपुत्रांना,प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेत नसल्याने धूतुम ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे आयओटीएल कंपनी समोर दि २० नोव्हेंबर २०२३ पासून आमरण उपोषण सुरू झाले आहे. दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी आमरण उपोषणाचा तिसरा दिवस होता . कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट देऊन या उपोषणाला जाहिर पाठिंबा दिला . व जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्रा कामगार नेते महेंद्र घरत यांनी उपोषण स्थळी घेत‌ला.

आपल्या मनोगतातून महेंद्र घरत यांनी कंपनीच्या गैर कारभारा विरोधात आवाज उठविला.यावेळी विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.तिसऱ्या दिवशीही अनेक मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहिर दिला.

इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेड (IOTL)धूतूम ता.उरण येथील प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाविरुद्ध धुतुम ग्रामपंचायतचे सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, ग्रामपंचायत सदस्य – प्रेमनाथ ठाकूर,स्मिता ठाकूर, सुचिता कडू, अनिता ठाकूर, करिष्मा ठाकूर, रविनाथ ठाकूर, प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

आत्तापर्यंत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत,रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संध्या दीपक ठाकूर , रायगड सेवा दल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कमलाकर घरात, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किरीट पाटील, उरण विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भालचंद्र घरत, उरण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उरण शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अफशा मुकरी, माजी नगरसेवक बबन कांबळे, भेंडखळ गावचे उपसरपंच दीपक ठाकूर, जासई विभागीय अध्यक्ष विनोद पाटील,केगाव विभागीय अध्यक्ष सदानंद पाटील, रायगड जिल्हा सेवा दल सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस इंटक कमिटीचे उपाध्यक्ष जयवंत पाटील,माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर,माजी पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर,शिवसेना द्रोणागिरी शाखा प्रमुख जगजीवन भोईर,काँग्रेसचे ओबीसी कोकण विभाग अध्यक्ष शंभु म्हात्रे, ओबीसी रायगड जिल्हा अध्यक्ष उमेश भोईर, एनएमकेजीएस या कामगार संघटनेचे सचिव वैभव पाटील,काँग्रेसचे उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते लक्ष्मणशेठ ठाकूर, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील,आदींनी तसेच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊ आपला जाहिर पाठिंबा दिला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page