संगमेश्वर तालुक्यातील सरपंच व उपसरपंच लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या ताब्यात

Spread the love

महाराष्ट्रातील अशी पहिलीच कारवाई रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र कौतुक – लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी

संगमेश्वर प्रतिनिधी: संगमेश्वर तालुक्यातील आजीवली ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच यांना 30000 ची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले यातील तक्रारदार हे- पुरुष, वय – 29 वर्षें

▶️ आरोपी – १. प्रशांत प्रदिप शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली.ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
२. सचिन रमेश पाटोळे, उप सरपंच, ग्रामपंचायत राजीवली.ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी

▶️ लाचेची मागणी – 40,000/- रू.
▶️ तडजोडीअंती लाचेची मागणी – 30,000/- रू
▶️ लाच स्विकारली– 30,000/- रू
▶️ हस्तगत रक्कम – 30,000/- रु
▶️ लाचेची मागणी दिनांक – 10/05/2023 रोजी
▶️ लाच स्विकारली दिनांक – 11/05/2023 रोजी
▶️ लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांचे मित्राचे वतीने सदर ग्रामपंचायत चे अखत्यारीतील पाखाडी तयार करणेचे चे काम त्यांनी केले होते. तक्रारदार यांनी यापूर्वी केलेल्या कामांचे बिल मंजूर करण्याचा मोबदला व सध्या पूर्ण झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्याचा मोबदला म्हणून इतर लोकसेवक प्रशांत शिर्के, सरपंच, ग्रामपंचायत राजीवली व इतर लोकसेवक सचिन पाटोळे, उपसरपंच ग्रामपंचायत राजीवली, तालुका संगमेश्वर यांनी तक्रारदार यांचेकडे 40,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 30,000/- रुपये लाचेची मागणी करून मागणी केलेली लाच रक्कमेपैकी 15000/- रू. सरपंच प्रशांत शिर्के यांनी व 15000/- रू. उपसरपंच सचिन पाटोळे यांनी आज रोजी स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले असून इतर लोकसेवक क्र. 1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
पुढील कारवाई चालू आहे. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा कारवाईच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचा विभाग आहे ,अनेक कठोर कारवाई करून अनेकांना तुरुंगात पाठवले या सर्व प्रक्रियेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मेहनत व नियोजनबध्द आखणी महत्वपूर्ण असल्यामुळे अनेक यशस्वी कारवाई होत आहे .अशा प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातून कौतुक होत आहे

▶️ सापळा पथक – अनंत कांबळे, पोलीस निरीक्षक, प्रवीण ताटे, पोलीस निरीक्षक, सपोफौ/ संदीप ओगले, पोहवा/ विशाल नलावडे, मपोहवा/ श्रेया विचारे,पोना/ दीपक आंबेकर, पोशि/ राजेश गावकर व चापोना/प्रशांत कांबळे

▶️ पर्यवेक्षण अधिकारी –
श्री. सुशांत चव्हाण,
पोलीस उप अधीक्षक,
ला.प्र.वि., रत्नागिरी

▶️ मार्गदर्शन अधिकारी –
मा. श्री. सुनिल लोखंडे,
पोलिस अधीक्षक,
ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे

मा. श्री. अनिल घेरडीकर,
अप्पर पोलीस अधीक्षक,
ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे

▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी

रत्नागिरी जिल्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील फोन व मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.

संपर्क –

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
रत्नागिरी कार्यालय–
फो.नं. – 02352-222893
श्री सुशांत चव्हाण, पो.उप.अधी. , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी
मो.नं. – 9823233044
श्री प्रविण ताटे, पो.नि., लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी
मो.नं. – 8055034343
श्री अनंत कांबळे, पो.नि., लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी
मो.न. – 7507417072

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page