
३१ ऑक्टोबर/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे लोहपुरुष सरदार पटेल यांची आज 148 व्या जयंती आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे जाऊन सरदार पटेल यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथील सरदार वल्लभ पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. त्यानंतर पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी ‘राष्ट्रीय एकता दिना’निमित्त जनतेला शपथ दिली आणि सुरक्षा दलांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. सरदार वल्लभ पटेल यांचा जन्म १८७५ साली गुजरातमध्ये झाला होता.
दरम्यान, गुजरातमधील एकता नगर येथील ‘राष्ट्रीय एकता दिन’ परेडमध्ये मुख्य आकर्षणांमध्ये CRPF च्या महिला बाइकर्सनी अप्रतिम कामगिरी केली. त्यासोबतच सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महिला पाईप बँड, गुजरात महिला पोलिसांचे नृत्यदिग्दर्शन, विशेष एनसीसी शो, स्कूल बँड यासह इतर आकर्षणांचा समावेश आहे. या प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय वायुसेनेचा फ्लाय पास्ट, व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमांतर्गत गावांचा आर्थिक दृष्टीकोन प्रदर्शित करण्यात आला.



