वेळंब, गुहागरची माहेरवाशीण सौ. अश्विनी झगडे यांना वैद्यकीय उपचारासाठी PM Cares Fund मधून ३ लाख तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून २ लाख उपलब्ध करून दिले.
जनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | फेब्रुवारी ४, २०२३.
सामाजिक क्षेत्रात निस्पृहपणे अग्रेसर असणारे श्री. संतोष जैतापकर गोरगरिबांच्या संकटात नेहमीच धावून जातात. याचाच प्रत्यय गुहागर तालुक्यातील वेळंब गावची माहेरवाशीण असणाऱ्या सौ. अश्विनीताई झगडे यांच्या कुटुंबीयांनी घेतला. श्री. जैतापकर यांनी एक वैद्यकीय समूह तयार केला असून सुरुवातीच्या काळात संपूर्ण गुहागर तालुक्यात या समूहाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. पुढे त्यांनी आपल्या कक्षा विस्तारत रत्नागिरी, रायगड आणि इतर ठिकाणीही गरजूंना वैद्यकीय सहकार्य पुरवले आहे.
गुहागर तालुक्यातील वेळंब गावच्या माहेरवाशीण सौ. अश्विनीताई झगडे (मु.पो. पेढे-परशुराम, ता. चिपळूण) यांना वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्याची गरज होती. त्यांनी आर्थिक सहकार्य मिळवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही पदरी निराशा पडत होती. यावेळी श्री. जैतापकर यांची मेडिकल टीम पुढे सरसावली व त्यांनी सौ. झगडे यांना धीर दिला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास आम्ही नक्कीच तुम्हाला आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देऊ; तेही शासनाच्या माध्यमातून असा विश्वास झगडे कुटुंबियांना दिला.
या वैद्यकीय टीममध्ये आपली सेवा देणारे श्री. रविंद्र लांजेकर, श्री. दीपक गुरव, श्री. मनोज डाफळे यांनी आवश्यक असणारी सौ. झगडे यांची सर्व कागदपत्रे तातडीने गोळा केली. त्यांची व्यवस्थित फाईल तयार करून ती योग्य ठिकाणी सदर केली. सदर प्रस्तावाचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर PM Cares Fund च्या माध्यमातून रुपये ३ लाख व मुख्यमंत्री सहायता निधीमधून रुपये २ लाख असे एकूण रुपये ५ लाख सौ. झगडे यांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिले.
श्री. काशीराम पाष्टे, श्री. संदीप खैर, श्री. संतोष निंबरे, श्री. रमेश आंग्रे, श्री. मितेश घडशी हे श्री. संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टिमचे सदस्य, तसेच श्री. गौरव वेल्हाळ, श्री सुशिल आंग्रे (सरपंच मूढर) यांनी या कामात मोलाचे योगदान दिले. या सर्वांच्या मदतीमुळेच सौ. झगडे यांच्यावर योग्य उपचार करण्यात कोणतीही आर्थिक अडचण आली नाही. सौ. झगडे यांचे कुटुंबीय तसेच ग्रामस्थ श्री. संतोष जैतापकर व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानत आहेत.