
जनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | एप्रिल ०६, २०२३.
गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध समाजसेवक, भारतीय जनता पक्ष उत्तर रत्नागिरी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमने वेळणेश्वर येथील श्री. दिनेश तांडेल यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ४५,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळवून दिले.
श्री. चंद्रकांत पावसकर, श्री. प्रकाश पावसकर, श्री. संदीप पावसकर, श्री. समीर पावसकर यांनी श्री. जैतापकर यांना तांडेल यांच्या निकडीची माहिती दिली. यानंतर आवश्यक माहिती व कागदपत्रांची पूर्तता करत जैतापकर यांच्या वैद्यकीय टीमच्या श्री. मनोज डाफळे, श्री. जयराम पवार, श्री. काशीराम पास्टे, श्री. संतोष निंबरे, श्री. मितेश घडशी या सदस्यांनी प्रस्ताव तयार केला. व पाठपुरावा करून श्री. तांडेल यांच्या उपचारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला.

राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना सातत्याने विविध मार्गांतून सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी श्री. जैतापकर प्रयत्न करतात. यासाठी त्यांची वैद्यकीय टीम नेहमी आघाडीवर असते. आत्तापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जवळपास १० लाखांचा निधी उपलब्ध करून देऊन रुग्णांना दिलासा दिला आहे. मुंबईस्थित चाकरमानी असोत वा खेड्यापाड्यातील ग्रामस्थ, निकडीच्या वेळी मदतीसाठी कोणाला पहिला फोन करायचा असेलच तर तो संतोष दादांना; हे समीकरण झाले आहे.

लग्नाचा बस्ता, लेहेंगा, कुर्ती, ड्रेस मटेरियल, शालू , मेंस इथनिक वेयर .
अविघ्न प्लाझा जे के फाईल आणि टी आर पी जवळ रत्नागिरी ४१५६१२
📲 9805474047