नवी दिल्ली- देशभरात विविध टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान प्रकिया चालू आहे. दिल्ली राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान २५ मे २०२५ ला होणार आहे.
दिल्लीतील सर्व सात लोकसभा मतदारसंघात अठराव्या शतकापासून पासून ते वर्तमानात प्रशासकीय सेवेत असणारे मराठी कुटुंबं राहत आहेत. मराठी समाजाची दिल्ली राज्यात सुमारे ४.५ ते ५ लाख लोकसंख्या आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, अध्यात्मिक अश्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ४० संस्था दिल्लीतील विविध भागामध्ये कार्यरत आहेत. सदर संस्थाच्या माध्यमातून मराठी समाज संघटित आहे.
कोंकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप युवानेते श्री. संतोष गांगण केंद्र शासनाच्या विविध समितीवर कार्यरत आहेत. माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. सुरेश प्रभू व माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दहा वर्षे केंद्रीय स्तरावर कामकाज करीत असतात. त्याअनुषंगाने दिल्लीत त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. तसेच मागील तीस वर्षे निवडणूक प्रक्रियेत अगदी बूथ स्तरावर काम करण्याचा प्रचंड अनुभव आहे.
त्यामुळे दिल्लीतील सात लोकसभा मतदार संघातील मराठी बांधवामध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी मराठी समाज समन्वयक म्हणून दिल्ली भाजप प्रदेश अध्यक्ष श्री. वीरेंद्र जीं सचदेवा यांनी जबाबदारी दिली असून नियोजनबद्ध प्रचार चालू आहे. त्यामुळे कोकणतील एका भाजप युवा नेत्याला दिल्ली काम करण्याची संधी मिळाली असून त्याचा दिल्लीच्या निवडणूकीत भाजपला निश्चित फायदा होणार आहे.