
जनशक्तीचा दबाव न्यूज | भातगाव | एप्रिल १३, २०२३.
भातगाव गोळेवाडी येथील नवतरुण विकास मंडळाची गेली अनेक वर्षे एकच मागणी होती. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वाडीत एखादा सभामंडप उपलब्ध व्हावा यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार, जि.प. सदस्य, स्थानिक पुढारी यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतू यापैकी कोणीही योग्य प्रतिसाद दिला नाही. केवळ आश्वासनांच्या कोरड्या सहानुभूतीवर बोळवण होत होती. याबाबत ज्यावेळी भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्ह्याचे ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष, प्रसिद्ध समाजसेवक श्री. संतोष जैतापकर यांची मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यानंतर क्षणाचाही विलंब न लावता “सदर सभामंडप ही तुमची आवश्यकता असल्याने शासकीय मदतीची वाट पहात बसण्यात अर्थ नाही. या सभामंडपासाठी लागणारा सर्व निधी मी देणगी स्वरूपात देतो.” असे अभिवचन श्री. जैतापकर यांनी दिले.

मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनस्वी आभार मानले आणि सभा मंडपाच्या कामाला सुरुवात केली. त्या सभामंडपाचे उद्घाटन गोळेवाडी नवतरुण विकास मंडळाच्या सार्वजनिक पूजेच्या दिवशी श्री. संतोष दादा जैतापकर यांच्या शुभहस्ते मोठया जल्लोषात करण्यात आले. संपूर्ण गोळेवाडीत संतोष जैतापकर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या सभामंडपाला श्री. लक्ष्मण सखाराम आग्रे (सभामंडप) असे नावं देण्यात आले. “संतोष दादा जैतापकर यांनी स्वखर्चाने दिलेले मोठं योगदान आहे. यापुढे संपूर्ण भातगाव एकजुटीने तुमच्या पाठीशी आहे.” अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जैतापकर म्हणाले, गाव असो वा मुंबई, ज्याठिकाणी आवश्यकता भासेल तिथे मला बोलवा. मी नेहमीच तुमच्या मदतीसाठी धावून येईन. महाराष्ट्र राज्याचे कार्यपरायण सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आपण भातगाव रस्त्यासाठी नुकतेच ५ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. अजूनही मोठमोठी कामे आपणाला करायची आहेत. पंचक्रोशीत भातगावचे नाव उन्नत करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. तुमचा माझा असाच स्नेहबंध दीर्घकाळ राहू दे.” यावेळी जैतापकर यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.