*मंडणगड (प्रतिनिधी):* सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागामार्फत ‘जीवन विद्या मिशन’ अंतर्गत ‘विद्यार्थी संस्कार’ कार्यक्रमाचे नुकतचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विष्णु जायभाये, क्रीडाप्रमुख डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, जीवन विद्या मिशनचे श्री. दत्ता केळस्कर, श्री. भरत पाटकर, श्री. सुधीर सोलकर, दीपा राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. शामराव वाघमारे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर डॉ. महेश कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली.
यावेळी कांचन पालव यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मानवी जीवनात संस्काराला खूप महत्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असून चांगले संस्कारच समाजाला श्रेष्ट बनवितात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. आपल्यावर चांगले संस्कार नसतील तर आपले जीवन हे भरकटेल्या जहाजांप्रमाणे आहे. याकरिता लहानपणापासनूच चांगल्या सवयी लावायला हव्यात. एक चांगला मानव व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घराघरातूनच होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी डॉ. विष्णु जायभाये यांनी उपस्थितांचे आभार मानले.
*फोटो : कार्यक्रमात विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना जीवन विद्या मिशनच्या कांचन पालव, सोबत इतर मान्यवर..*