
२०१४ ची निवडणुक भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर लढवणारे संजय यादवराव पुन्हा निवडणुक रिंगणात..
राजापूर / प्रतिनिधी – समृध्द कोकण संघटना अंतर्गत स्वायत्त कोकण समितीच्या माध्यमातुन राजापूर लांजा साखरपा विधानसभा निवडणुक लढवणार असल्याची घोषणा समृध्द कोकण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव यानी मंगळवारी राजापूर येथे केली आहे . त्यामुळे राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातुन उमेदवारीची पहिली घोषणा झाली आहे .
सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडुन निवडणुक लढवलेले संजय यादवराव पुन्हा दहा वर्षानी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने उंबरठ्यावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे आहेत . सन २०१४ च्या निवडणुकीत संजय यादवराव याना सुमारे दहा हजार मते मिळाली होती . त्यावेळी भारतिय जनता पक्षाने या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातुन कमळ या निशानीवर प्रथम निवडणुक लढवताना या मतदारसंघासाठी पुर्ण नवा चेहरा संजय यादवराव यांच्या रुपाने दिला होता . मात्र त्यानंतर झालेल्या २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा भाजपाने युतीच्या माध्यमातुन निवडणुक लढवत हा मतदारसंघ आपल्या मित्रपक्ष शिवसेनेला सोडला होता .
तेव्हापासुन या मतदारसंघात समृध्द कोकण संघटनेच्या माध्यमातुन संजय यादवराव हे पर्यटन , कृषी व त्याला पुरक असणारे उद्योग यावर काम करत आहेत . आंबा , काजु उत्पादक शेतकरी व त्यांच्या समस्या यासाठी ते कार्यरत असुन त्यानी गेल्या महिण्यात भू येथुन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलन करत शासनाचे लक्ष कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधले होते .
विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याअगोदरच समृध्द कोकण संघटना अंतर्गत स्वायत्त कोकण समीतीच्या माध्यमातुन यावेळी आपण निवडणुक रिंगनात उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी संजय यादवराव यानी राजापूर येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे . त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत रंगत येणार असल्याचे मानले जात आहे .