मुंबई : त्यांच्या पक्षाला १८ वर्ष झाली आहेत, म्हणजे त्यांचा पक्ष वयात आला आहे. पण १८ वर्षानंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात’ अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला आणि देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलत आहेत. यातून त्यांना उद्धव ठाकरे यांची धास्ती आणि भय किती आहे हे दिसते आहे. ‘२० वर्ष झाली विसरा तुम्ही, तुमचं काम करा’ असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सणसणीत उत्तर दिलं.
राऊत यांनी म्हटले की, ‘उद्धव ठाकरे हे इतके मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर बोलतात, राणे इतक्या वर्षांनंतरही उद्धव ठाकरेंवर बोलतात, भाजपवाले उद्धव ठाकरेंवर बोलतात आणि राज ठाकरे हे देखील उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतायत, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांची भीती सगळ्यांना वाटते आहे. तुम्ही तुमच्या पक्षावर बोला. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून वर आले आहेत. कायदा सुव्यवस्था, अमृतपाल महाराष्ट्रात लपलाय त्यामुळे निर्माण झालेला धोका यावर कोणी बोलत नाही. पण तोफा फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची धास्ती आणि भय किती आहे विरोधकांना हे दिसते आहे. राज ठाकरे यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कान टोचले, असा प्रश्न केला असता राऊत म्हणाले की, ‘ त्यांनी कान टोचण्याचा धंदा सुरू करावा , कोणाला दुसरं काही काम नसेल तर नाक कान टोचण्याचे उद्योग सुरू करावेत’ भाजपने दिलेली भाषण आजच सर्वच पक्ष वाचून दाखवत आहेत आणि त्यांचा मुख्य गाभा हा उद्धव ठाकरे हेच आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा