मुंबई- आज सकाळी मुंबई खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटात गेलेले १३ खासदार पडणार असा दावा केला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील १३ खासदारांची लोकसभा निवडणूकीसाठी कामकाजाचा आढावा घेणारी बैठक वर्षावर बोलावली आहे. याच मुद्दयाला धरून खासदार संजय राऊत यांनी, ‘शिंदे गटाकडे लोकसभेसाठी १३ उमेदवार असतील तर त्यातला एकही उमेदवार निवडून येणार नाही,असा दावा केला आहे.
हा दावा करतानाच १९ खासदार आमच्याकडे आहेत.त्या सर्व जागांवर परत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचं मेरिटवर सिलेक्शन होणार आहे,यात काही दूमत नाही. आमचे लोकसभेत १९ खासदार होते. आम्ही १९ पुन्हा खासदार म्हणून निवडून आणू. माझा शब्द आहे.आमचे १९ खासदार लोकसभेत असतील,असा दावा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
मागील वर्षी शिवसेनेत झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेचे १३ आमदार शिंदेंकडे गेले.त्यानंतर विनायक राऊत,संजय राऊत,राजन विचारे असे काही खासदार अद्यापही ठाकरेंकडेच आहेत.अशात पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी दोन्ही गटांनी आपआपली कंबर कसली आहे. आता जनता कुणाच्या बाजूने कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.