मुंबई :- मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गुडांबरोबर ‘चाय पे चर्चा’ होत आहे. हे सर्व शिंदे सेनेचे गुंड आहेत. मुख्यमंत्री राज्यातील गुंडांना पाठीशी घालत आहेत. असा आरोप ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. ठाकरे गटाचे दहिसरमधील नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर ते आज माध्यमांशी बोलत होते.
खासदार राऊत म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे वर्षा बंगल्यावर गुंडांसोबत ‘चाय पे चर्चा’ करत आहेत. तर मग कायदा सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार? मुख्यमंत्र्यावर कारवाई का नाही ? असे सवाल देखील त्यांनी केले. राज्यात गोळीबाराच्या इतक्या गंभीर घटना घडत असताना, गृहमंत्र्यांनी कुठे असायला हवे, ते कुठे आहेत ? असा प्रश्न देखील राऊत यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपस्थित केला आहे.
गेल्या दीड वर्षात फक्त गुंडागिरीच्याच बातम्या कानावर येत आहेत. गुडांनी चालवलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र झाले आहे. शिंदेंच्या जिल्ह्यात पोलिस ठाण्यात हत्या होतायत. पण २०२४ नंतर सर्व गुंडांचा हिशोब केला जाईल, असे आव्हानदेखील राऊत यांनी राज्यातील गुडांना दिले आहे. आज मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाला हजारो गुंड येतील. मुख्यमंत्री वाढदिवस कसला साजरा करतायत ? असा सवाल देखील खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे.
मुंबईतील दहिसर भागात झालेल्या गोळीबारात शिवसेना (यूबीटी) नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळीबारात हत्या झाल्याबद्दल पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणतात, ” महाराष्ट्रात ‘गुंडा राज’ आणि ‘माफिया राज’ आहे. हे ‘माफिया राज’ ‘शिंदे सरकारचा आशीर्वाद आहे…आम्ही गप्प बसणार नाही. तुमची ईडी, सीबीआय आता कुठे आहे ? या ‘गुंडा राज’ला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत.
जाहिरात