
संगमेश्वर /दिनेश आंब्रे – पोलीस ठाणे संगमेश्वर येथे नूतन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांचा संगम जेष्ठ नागरिक संघ संगमेश्वर या संस्थेचे अध्यक्ष प्रमोद भार्गवराम शेट्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष उदय संसारे यांनी मनोगत व्यक्त करताना वृक्षारोपण, संघाचे विविध उपक्रम मागील काही वर्षात झाले तेव्हा तत्कालीन पोलीस निरीक्षक उदय झावरे व त्या त्यावेळी होऊन गेलेले पोलीस निरीक्षक उप निरीक्षक व पोलीस दलाचे उत्कृष्ट सहकार्य लाभले असा विशेष उल्लेख केला.

संघाचे अध्यक्ष प्रमोद शेट्ये यांनी मनोगत व्यक्त करताना संघास पुढे अशी साथ संगमेश्वर पोलीस ठाण्याची वेळोवेळी लाभावी तसेच पो. नि.राजाराम चव्हाण यांची मुंबई पुणे सिंधुदुर्ग अशा विविध ठिकाणी उत्कृष्ट कारकीर्द व कामकाजाचा ठसा उमटविल्याचे असल्याचा महत्त्वपूर्ण उल्लेख केला.
पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी संगम जेष्ठ नागरिक संघास अविरतपणे सहयोग लाभेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी संघाचे कोषाध्यक्ष जनार्दन शिरगावकर सदस्य श्री प्रकाश कोळवणकर, विनायक पात्रे, भिकाजी साळवी, बाबासाहेब प्रभावळे आदी उपस्थित होते.