
दिनेश आंब्रे/ संगमेश्वर- संगमेश्वर येथील छावा मराठा योद्धा संघटनेचे तालुका, सचिव श्री. धनंजय भांगे सर हे नेहमी गौरगरिबांच्या मदतीला धावून जातात. संगमेश्वर तालुक्यात कोणाचीही काहीही अडचण असेल तरी ते समजूतीने सोडविण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी त्यांना एक माहीती मिळाली की संगमेश्वर ग्रामीण रुग्नालयात मध्ये श्री. राजू चव्हाण नावाची एक व्यक्ती औषध उपचारासाठी दाखल आहे. त्याचे कोणीती नातेवाईक नाही. राजू चव्हाण हा गेल्या तिन वर्षा पासून छावा मराठा योद्धा संघटने चे जिल्हाध्यक्ष श्री. वहाब दळवी यांच्या फार्म हौऊस मध्ये कामाला आहे.
असे. समजता श्री.भांगे यांनी हॉस्पिटल मध्ये धाव घेतली व त्याला चाय बिस्कीट, रात्री चे जेवन देवून त्याची विचारपूस किली. व त्याच्या तब्येतीबद्दल माहिती घेतली व त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचे औषधी उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. तसेच राजू चव्हाण यांना सांगितले की तुला काही मदत लागल्यास कळविण्यास सांगितले. राजू चव्हाण याने अश्रू भरल्या डोळयांनी श्री धनंजय भांगे यांचे आभार मानले.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर