
संगमेश्वर – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२/०९/२०२५ रोजी श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब या ठिकाणी १७ वर्षे वयोगट तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
स्पर्धेमध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी कसबा संचलित, न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयातील १७ वर्षे वयोगट विद्यार्थी व विद्यार्थीनींचे संघ सहभागी झालेले होते.
सदर स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या १७ वर्षे वयोगट मुलींच्या कबड्डी संघाने अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली व तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये संघाने उपविजेतेपद पटकाविले.
तसेच कसबा हायस्कूलच्या १७ वर्षे वयोगट मुलांच्याही संघाने सदर स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर केला.
गेल्या अनेक वर्षापासून कसबा हायस्कूलने विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर यश संपादन करून खेळाच्या क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा दबदबा निर्माण केलेला आहे.
शाळेच्या परंपरेला साजेसे यश मिळवत कबड्डी संघातील विद्यार्थीनींनी संपूर्ण स्पर्धेत जिद्द चिकाटी व संघटित खेळाची छाप सोडून शाळेचे नाव अभिमानाने उज्वल केले आहे.
सदर दोन्ही संघांना विद्यालयातील शिक्षक श्री एन एस ओकटे व श्री यू टी गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
कबड्डी संघातील द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष श्री नियाज कापडी, उपाध्यक्ष श्री इब्राहिम काझी, सचिव श्री सईद उपाद्ये, सहसचिव श्री शौकत अली खलफे, खजिनदार श्री शिकुर गैबी, सर्व सदस्य, प्राचार्य श्री एच जी शेख, पर्यवेक्षक श्री एस ए पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्यावतीने अभिनंदन केले.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर