
संगमेश्वर:(दिनेश अंब्रे)- संगमेश्वर पोलिस स्टेशन येथे नव्याने नियुक्त झालेले पोलिस निरीक्षक श्री.राजाराम चव्हाण यांची संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री.चव्हाण यांच्याशी हितगुज करताना लक्षात आले की पोलिस खात्यात नियुक्त होण्याआधी त्यांनी १९८५ ते २००० यादरम्यान १५ वर्षे भारतीय नौदलात एव्हिशन टेक्निकल ऑफिसर म्हणून काम केले आहे.त्यांची सेवा अंदमान निकोबार येथे सुरू झाली.त्यानंतर त्यांनी आपल्या सर्वाधिक काळ गोवा येथे काम केले.काही वर्षे त्यानी कोच्ची व विशाखापट्टणम येथे काम केले.सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी कोल्हापूर येथे मेडिकल सुरू केले.हे करत असताना त्यांच्या मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

त्यांना कतार एअरवेज व आयबी मध्ये काम करण्याची संधी देखील होती परंतु त्यांना राज्यसरकार मध्ये काम करायची इच्छा होती.२००४ साली पहिल्या प्रयत्नात ते एमपीएससी उत्तीर्ण होऊन पीएसआय झाले.त्यांच्या सेवेची सुरुवातीची ३ वर्षे शिक्रापूर ,पुणे येथे झाली.त्यांनी ३ वर्षे लोणीगंज येथे काम केले.त्यानंतर त्यांनी सीआयडी क्राइम ब्रांचसाठी जळगाव व सांगली येथे काम केले.त्यानंतर त्यांनी नागरी हक्क संरक्षण विभागात सिंधुदुर्ग येथे काम केले.हे करत असताना अधेमध्ये रत्नागिरीचा चार्जदेखील त्यांच्याकडे असायचा त्यामुळे त्यांना रत्नागिरीचा चांगला परिचय झाला.
सदिच्छा भेटीवेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुजीब खान, उपाध्यक्ष वहाब दळवी,सहसचिव मिलिंद कडवईकर,सह खजिनदार नियाज खान,सदस्य दीपक तुळसणकर,दिनेश आंब्रे उपस्थित होते.