श्रीकृष्ण खातू /धामणी – अंत्रवली केंद्राने मोठा गटाचे सर्वसाधारण विजेतेपद.व संगमेश्वर नं.2केंद्राने लहान गटाचे विजेतेपद पटकावले.
पंचायत समिती संगमेश्वर अंतर्गत संगमेश्वर प्रभागाच्या हिवाळी क्रीडास्पर्धा कळंबस्ते क्रीडानगरीत मोठ्या उत्साहाने पार पडल्या. प्रथमतः क्रीडा ज्योतीचे शानदार संचलन विद्यार्थ्यानी केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्यात आला.सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी क्रीडा शपथ घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना शिक्षण विस्तार अधिकारी श्री.नाईक साहेब यांनी चांगला गुरू भेटल्यामुळे चांगला शिष्य कसा घडतो.याचे उदाहरण महान खेळाडू सचिन तेंडुलकर व विनोद कांबळी या दोघांचे दिले.ग्रामीण भागातील खेळाडू गुणवान आहेत.त्यांच्यातील क्षमता ओळखण्याचे काम शिक्षक वर्ग करत असतात.विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक प्रकारांत आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थित पालक व क्रीडारसिकांचे मनोरंजन केले, व शाबासकीची थाप मिळवली. संपूर्ण स्पर्धांचे नियोजन करताना संगमेश्वर प्रभागातील सर्व पाच केंद्रातील शिक्षक तसेच कळंबस्ते गावचे ग्रामस्थ यांच्या एकत्रितपणे सहकार्य भावनेने केलेल्या कार्यामुळे स्पर्धा यशस्वी झाल्या. बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष ,विविध कार्यकारी सोसायटी कळंबस्ते व ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष जुवळे , फणसवणे गुरववाडी सरपंच सौ.शारदा तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुनिल घडशी ,श्री.संजय वणये,माजी सरपंच श्री.विठ्ठल गुरव मान्यवर व्यक्ती च्या हस्ते झाला.
▶️स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
`वैयक्तिक अंतिम निकाल – लहान गट (मुलगे/मुली)`
🔹️५० मी. धावणे –*मुलगे
विजेता – सोहम मंगेश गुडेकर (केंद्र अंत्रवली
उपविजेता –अर्णव श्रीराम गराटे(केंद्र संगमेश्वर नंबर १)
🔹️५०मीटर धावणे मुली
१)लक्ष्मी सतिश काणसे
२) समृद्धी संतोष चांदिवडे
🔹️उंच उडी –*मुलगे
विजेता – अर्थव प्रदिप बसवणकर
उपविजेता – जय उपेश काजवे
उंच उडी – मुली
विजेता – समृद्धी निलेश काष्टे
उपविजेता – स्वरा विलास पानगले
🔹️लांब उडी –*मुलगे
विजेता – अंश नरेश दैत
उपविजेता – अर्थव प्रदिप बसवणकर
लांब उडी -मुली
विजेता -आरोही विनोद सावंत
उपविजेता – अनवी केतन इचले
⏩️गोळा फेक –*
विजेता – ऋषभ नितीन चव्हाण (केंद्र – संगमेश्वर नंबर.१)
उपविजेता – सार्थक निलेश पानगले
▶️थाळी फेक – मुलगे
विजेता – प्रथम सुरेश गुरव
उपविजेता – सार्थक निलेश पानगले
थाळी फेक -मुली
विजेता -समृद्धी संतोष चांदिवडे
उपविजेता – शुभ्रा संतोष शेट्ये
`वैयक्तिक अंतिम निकाल –मोठा गट (मुलगे/मुली)`
▶️५० मी. धावणे –
विजेता –आर्यन अनंत बालदे (केंद्र – संगमेश्वर १)
उपविजेता – ओंकार मंगेश साटले (केंद्र कळंबस्ते)
मुली
विजेता – संयुक्ता संतोष गुरव
उपविजेता – वेदिका दिनेश मालप
▶️लांब उडी –*मुलगे
विजेता – आर्यन अनंत बालदे
उपविजेता – ओंकार मंगेश साटले
मुली मोठा गट
विजेता – सानिया जयंत कालीम
➡️उपविजेता – नेत्रा अनिल सोलकर
▶️थाळी फेक –मुलगे
▪️विजेता – मयुरेश मधुकर गुरव
▪️उपविजेता – आर्यन प्रविण गुडेकर
मुली.
.
🔹️विजेता -निधी संजय मालप
▪️उपविजेता-सानिया जयंत कालीम
▶️गोळा फेक –*
विजेता – आरूष नितेश मालप
उपविजेता –आर्यन प्रविण गुडेकर
▶️या स्पर्धांसोबत झालेल्या सांघिक स्पर्धांचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे:*
▶️सांघिक स्पर्धा – लहान गट*
🔹️कबड्डी मुलगे –*
विजेता – कळंबस्ते केंद्र
उपविजेता –अंत्रवली केंद्र
5
🔹️खो-खो मुलगे –*
विजेता – संगमेश्वर नंबर १
उपविजेता – अंत्रवली केंद्र
🔹️खो-खो मुली –*
विजेता – संगमेश्वर नंबर २
उपविजेता – संगमेश्वर नंबर १
🔹️लंगडी मुली –*
▪️विजेता –संगमेश्वर नंबर २
▪️उपविजेता – कळंबस्ते केंद्र
🔹️सांघिक स्पर्धा – मोठा गट
🔹️कबड्डी मुलगे –
▪️विजेता – अंत्रवली केंद्र
▪️उपविजेता – संगमेश्वर नंबर १
🔹️कबड्डी मुली –
▪️विजेता – अंत्रवली केंद्र
▪️उपविजेता – कळंबस्ते केंद्र
🔹️खो-खो मुलगे –
▪️विजेता – संगमेश्वर नंबर १
▪️उपविजेता –कळंबस्ते केंद्र
🔹️खो-खो मुली –
▪️विजेता – अंत्रवली केंद्र
▪️उपविजेता – कळंबस्ते केंद्र
🔹️लंगडी मुली –
▪️विजेता –कळंबस्ते केंद्र
▪️उपविजेता – अंत्रवली केंद्र
संगमेश्वर प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.प्रदिप पाटील साहेब, संगमेश्वर नंबर १व २केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.दिलीप जाधव सर, अंत्रवली केंद्रप्रमुख श्री.भास्कर जंगम सर कळंबस्ते केंद्रप्रमुख श्री.संदेश महाडीक, शृगारपुर केंद्रप्रमुख श्री.प्रमोद चिले सर,कळंबस्ते सरपंच श्री. रत्नाकर सनगरे मुख्याध्यापक .विजय मोहिते ,मुख्याध्यापिका श्रीम.भिडे मॅडम, सौ.मिलन देवरुखकर, श्रीम.अरुणा शिरगावकर मॅडम, श्रीम.संसारे मॅडम ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुनिल घडशी सर्व सदस्य व ग्रामस्थ, तसेच प्रभागातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडाप्रेमी पालक बंधू-भगिनी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मलदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय मोहिते यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार केंद्रप्रमुख श्री. संदेश महाडिक यांनी मानले.