युद्ध पातळीवर काम सुरु असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता…
संगमेश्वर- महामार्ग ठेकेदार कंपनीने केलेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे संगमेश्वर तालुका अंधारात राहण्याचे वेळ आली आहे. ठेकेदार कंपनीने शास्त्री पूल येथे भूमिगत टाकलेल्या केबलमध्ये बिघाड झाला आहे.
३३ केवी आरवली – संगमेश्वर लाईनची केबल शस्त्री पुल येथे शॉर्ट झाली आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीने भूमिगत टाकलेल्या वायर मध्ये काही दिवसात झालेल्या बिघाडामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे
तसेच 33 kv निवळी – संगमेश्वर लाईन राजश्री पंप पर्यंत चालू आहे. राजश्री पंप ते पॉवर हाऊस पर्यंत फॉल्ट आहे. फॉल्ट काढण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून अर्धा एक तासांमध्ये वीजपुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.