संगमेश्वर : आज संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य डोंगर दुर्गम परिसरात असलेल्या समाज प्रबोधन शिक्षण संस्था मुंबई संचलित डॉ.रश्मिकांत दिपचंद गार्डी माध्यमिक विद्यालय कळंबस्ते-वाडाविसराड येथील गरीबातील गरीब विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शालेय साहित्याचे पेन व वह्या वाटप करण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मितहास्य दिसून आले.या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी यांनी संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे कौतुक केले.संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. समाजाचे प्रश्न लेखनीतून मांडत असताना केवळ लेखनीतून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत या उध्दात हेतूने सामाजिक कार्यात उतरून रक्तदान, मोफत आरोग्य शिबीर, अपदग्रस्तांना मदत, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमात उतरून निसर्ग व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण,विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धात्मक परिक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम असे उपक्रम राबवित असतो.संगमेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य डोंगर दुर्गम परिसरातील गरीब विदयार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा उद्देश असल्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष मुजीब खान यांनी सांगितले.
यावेळी यावेळी संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मुजीब खान,उपाध्यक्ष वहाब दळवी, सचिव दिनेश अंब्रे,पत्रकार असलम खान, शब्बीर मजगावकर, नियाझ खान, शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.