▪️कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर संस्थेच्या वतीने देवरूख येथे मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट २०१७ पासून चालविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शिक्षण संस्थेच्या विनंतीनुसार पतपेढीने रू.५ लाखांची देणगी जाहीर केली.
💫 पतपेढी अध्यक्ष अविनाश शांताराम लाड यांनी दिनांक २ मे २०२३ रोजी सदर देणगीचा चेक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस शांताराम बा. गोरुले यांजकडे सुपूर्द केला.
▪️यावेळी पतपेढी उपाध्यक्ष शांताराम सालप, सीईओ प्रकाश आगरे, संचालक पांडुरंग खाडे, सौ वैशाली गिडये, वैभव तावडे, आत्माराम भुरावने, कुणबी समाजोन्नती संघ कार्यकारिणी सदस्य सुरेश कानाल आणि कुणबी बँक संचालक पी. डी. ठोंबरे आदी उपस्थित होते.
▪️सदर पतपेढीचे कै.मामासाहेब भुवड हे अध्यक्ष होते.