
सखोल चौकशी करून कारवाई करण्याची राजेंद्रकुमार पोमेंडकर यांची मागणी
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यात कोतवाल पद भरती झाली ही संशयास्पद असून याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) तालुकाध्यक्ष,श्री राजेंद कुमार पोमेंडकर यांनी केली आहे.
संगमेश्वर तालुक्यातून बेरोजगारीला कंटाळून अनेक उच्चशिक्षित एमपीएससी; यूपीएससी स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेणारी मोठया प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी तालुक्यातील कोतवाल पदाकरिता परीक्षा दिली होती; मात्र निवड झालेली उमेदवार यांची यादी बघता स्थानिकामध्ये भरती बद्दल संशय निर्माण झाला आहे तसेच स्थानिक उमेदवाराना देखील संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर जनमानसात ऐकायला येत आहे असे पोमेंडकर यानी म्हटले आहे.
तरी झालेल्या कोतवाल पद भरतीची तीन सदस्यांची समिती स्थापन करून चौकशी करण्यात यावी तरच पदवीधर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्यांना योग्य तो न्याय मिळेल..अशी मागणी श्री पोमेंडकर यानी केली आहे.