जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | सप्टेंबर १०, २०२३.
संगमेश्वर तालुका शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख नंदादीप बोरुकर यांचे नावडी शिवसेनेतर्फे (उ.बा.ठा) स्वागत करण्यात आले.
तालुका प्रमुख निवडीनंतर ते प्रथमच संगमेश्वर येथे आले होते. त्यांचे स्वागत सिद्धेश सावंत उपविभाग संघटक नावडी, वैभव मुरकर नावडी शहर संघटक, शाखा प्रमुख सुरज सुर्वे, जनार्दन रहाटे, शिवसैनिक संतोष सुर्वे, प्रकाश खातू, प्रदिप मुरकर, विनोद मुळ्ये, परशुराम पवार, नंदकुमार सुर्वे यांनी जोरदार स्वागत केले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उप तालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर, माजी पंचायत समिती सभापती जया माने आदी मान्यवर उपस्थित होते.