▪️संगमेश्वर :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी -सिंधुदुर्ग चे खासदार श्री. विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या माध्यमातून विभागप्रमुख श्री. अनिल मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना माखजन जिल्हा परिषद गटाच्या वतीने माखजन बाजारपेठ येथे “होऊ द्या चर्चा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. .
▪️या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक चिपळूण -संगमेश्वर विधानसभा संघटक श्री. रोहन बने व तालुकाप्रमुख श्री.नंददीप बोरुकर यांची उपस्थिती लाभली.
▪️वाढती महागाई, पेट्रोल -डिझेल दरवाढ, जिल्हा परिषद शाळा खाजगीकरण , कंत्राटी भरती वाढती बेरोजगारी आणि फसव्या योजना यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आला.
▪️या कार्यक्रमाला माजी सभापती श्री.दिलीप सावंत, माजी सभापती श्री सुभाष भाई नलावडे, माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान बुरंबाड सरपंच सौ.नम्रता कवळकर, माजी उपसभापती श्री. संतोष डावल, श्री. विकास सुर्वे, उपविभाग प्रमुख श्री.प्रशांत विचारे, आरवली सरपंच श्री. निलेश भुवड, जेष्ठ शिवसैनिक श्री.अनंत गुरव, माखजन माजी सरपंच सौ. खातु, श्री.सतिश कुंभार शाखा प्रमुख श्री.बाबु मोरे,श्री.अनिल राऊत, श्री.शांताराम भाई मते, श्री.श्रीधर जोगले, श्री.विजय जोगले,श्री.मया सुर्वे अनंत चव्हाण, श्री.मुकेश चव्हाण, श्री.तुकाराम मेस्त्री, श्री.दिपक शिगवण, श्री. शंकर सुवरे, श्री.विजय कवलकर, श्री.चंद्रकांत वरवटकर, श्री.पिंट्या सुर्वे, श्री. संजय शिंदे, मज्दीत भाई खान, श्री.सुधाकर जाधव, श्री.गंगाराम भायजे व सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.