संगमेश्वर l 13 मे 2024- संगमेश्वर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार पदावर कार्यरत असलेले तसेच यापूर्वी रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, खेड आदी पोलीस ठाण्यात सेवा कर्तव्यात कसूर न करता इमानेइतबारे पोलीस खात्यात तेहत्तीस वर्ष सेवा केल्याने प्रशांत शिंदे यांचा ०१ मे महाराष्ट्र दिनी मानाचा पोलीस महासंचालक पद देऊन गौरव करण्यात आला.
प्रशांत शिंदे यांनी प्रामाणिक व कर्तव्यदक्षपणे सेवा केल्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलाने त्यांच्या सेवेची पोच पावती म्हणुन त्यांना ज्या सन्मानाने केल्याने तालुकावासियांसह रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, खेड आदी ठिकाणाहून सामाजिक, राजकीय, पत्रकार, पोलीस मित्रांसह सर्वस्तरातून प्रत्यक्ष वा फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाद्वारे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छांचा ओघ सुरु असून, त्यामध्ये संगमेश्वर येथील जेष्ठ नागरिकांमध्ये, धामणी येथील श्रीकृष्ण खातू, संगमेश्वर ह्युमन राईट्सचे कार्याध्यक्ष दादा कोळवणकर जेष्ठ नागरिक संघाचे सचिव सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उदय ससांरे आदींनी पोलीस ठाण्यात जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन शुभेच्छा व पत्रफ्रेम भेट देऊन सन्मानित केले.
याचवेळी येथील येथील सहायक पोलीस फौजदार चंद्रकांत कांबळे यांच्याही उत्तम कामगिरीची दखल घेत सन 2022 साली पोलीस महासंचालक पद देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांचाही सन्मान दादा कोळवणकर, दिनेश आंब्रे, उदय संसारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भेट स्वरूपात देण्यात आलेल्या शुभेच्छा पत्राचे वाचन श्रीकृष्ण खातू यांनी करून उपस्थितांची मने जिंकली. व छोट्या मोठ्या शाबासकीतून समोरील व्यक्तीला नवीन उमेद व प्रेरणा मिळावी हाच सन्मान करण्याचा हेतू असल्याचे खातू यांनी स्पष्ट केले.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या छोट्याखानी कार्यक्रमावेळी श्रीकृष्ण खातू, दादा कोळवणकर, उदय संसारे, दिनेश आंब्रे, भिरकोंड येथील मंगेश शीतप, सहाय्य्क पोलीस फौजदार संजय शेलार, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोलगे, महिला पोलीस क्रांती सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर आदी उपस्थित होते. अभिनंदन, शुभेच्छांचा होणारा वर्षाव हा आपल्यावर असलेला लोकांचा विश्वास व प्रेम पाहून सत्कारमूर्ती प्रशांत शिंदे यावेळी मात्र चांगलेच भावुक झाले होते.