संगमेश्वर/ दिनेश आंब्रे /प्रतिनिधी – केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मार्फत सद्ध्या दि.१७सप्टेंबर ते २ऑक्टोबर २०२४अखेर स्वच्छता अभियान पंधरवडा चालू आहे. त्याच अनुषंगाने परचुरी गावातील समाज सेवा दुदमवाडी मंडळाकडून गेली २९ वर्षे परंपरा राखत २०२४ याही वर्षी ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे परिसराची स्वच्छता दि.२४सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आली.
यावेळी कसबा सरपंच पूजा लाणे,नावडी सरपंच प्रज्ञा कोळवणकर,ग्रामीण रूग्णालय अधिक्षक डाॅ. अभिजीत मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश(दादा) कोळवणकर, उपसरपंच विवेक शेरे,
पत्रकार वहाब दळवी, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर , ग्राम विकास अधिकारी रविंद्र खंडागळे, समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष वसंत दुदम, उपाध्यक्ष दिनेश दुदम, गावकर अनिल दुदम
समाज सेवक वसंत मेस्त्री माजी सैनिक पाल्य व पोलीस तपास साप्ताहिक पत्रकार दिनेश अंब्रे, परचुरी माजी सैनिक व तंटामुक्तीचे अध्यक्ष अनंत शिंदे, महिला अध्यक्षा ममता दुदम आदी मान्यवर उपस्थित होते.
संत तुकडोजी महाराजांनी स्वच्छतेचा दिलेला संदेश म्हणजे स्वच्छता हीच खरी सेवा समजून परचुरी येथील २८बंधूभगिनींनी सामील होऊन एक वेगळा आदर्श दाखवला आहे. हे मंडळ सतत २९वर्षे वर्षातून दोन वेळा वेगळ्या ठिकाणी जाऊन असे राष्ट्रीय काम करतात.
श्रमदानात सहभागी. ….
अनंत शिंदे, अनिल दुदम, वसंत दुदम, दिनेश दुदम, शिवाजी दुदम, शांताराम दुदम, रविंद्र दुदम, जगन्नाथ दुदम, वसंत मेस्त्री, रामचंद्र दुदम, ममता दुदम,अंकुश दुदम, अर्जुन दुदम, विनायक दुदम, शंकर दुदम, गणपत दुदम, अशोक दुदम, महेश दुदम , सुभाष दुदम, संजय दुदम, शेवंती दुदम,रेश्मी दुदम, अंकिता दुदम, दिक्षीता जड्यार,रोशनी दुदम, अश्विनी दुदम, दिक्षा दुदम,अश्विनी मो.दुदम, ज्योती दुदम, यानी मोठ्या मनाने या अभियानात सहभाग घेतला.