
3 बैल आणि बोलेरो गाडी संगमेश्वर पोलिसांनी घेतली ताब्यात..
संगमेश्वर पोलिसांची धडक दुसऱ्यांदा कारवाई…
दीपक भोसले / संगमेश्वर…
▪️संगमेश्वर : कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणाऱ्या आणि अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणाऱ्या एकाला संगमेश्वर पोलिसांनी पकडले असून 3 बैल आणि बोलेरो गाडी संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
👉🏻 संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार..
▪️मंगेश दिनकर सुर्वे राहणार अंत्रवली सुर्वेवाडी त्यांच्या ताब्यातील बोलेरो गाडी नंबर एम एच 08 ए पी 5092 मध्ये 3 बैल गाडीच्या हौद्या मध्ये दाटीवाटीने कमी जागेत दोरीने बांधून जनावरे वाहतुकीचा कोणताही परवा नसताना गैर कायदा कत्तलीसाठी वाहतूक करीत असल्याची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहकारी सचिन कामेरकर, शांताराम पंदेरे, प्रशांत शिंदे ,सिद्धेश आंब्रे, बाबू खोंदल अमरदिप मोरे, रोहीत पाटील, सिद्धेश अंब्रे, आदि सह सापळा रचून शनिवारी पहाटेच्या दरम्यान संगमेश्वर बस स्थानक नाका येथे पकडले.
👉🏻 याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात सिद्धेश सुनील आंब्रे यांनी फिर्याद दिली असून मंगेश दिनकर सुर्वे विरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास पोलीस शिंदे करत आहेत..