संगमेश्वर- गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या अनुषंगाने संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने संगमेश्वर रामपेठ मापारी मोहल्ला ते संगमेश्वर बाजारपेठेतून पोलिस संचालन करण्यात आले.
संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी. श्री. चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत आणि संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्यासह संगमेश्वर एस. टी स्टॅन्ड, बाजारपेठ, रामपेठ, मापारी मोहल्ला असा रूट मार्च द घेण्यात आला. रूट मार्च करिता 02 अधिकारी 28 अंमलदार , 14 होमगार्ड 2 आरसीपी प्लाटून सहभागी होते.
रूटमार्च दरम्यान गणेशोत्सवाच्या सूचना पी. ए. सिस्टिमद्वारे नागरिकांना सूचना देण्यात आल्या.