11 बैलांचा समावेश, दोघांच्या वर गुन्हा दाखल
संगमेश्वर दि 4 प्रतिनिधी
संगमेश्वर साखरपा मार्गावर संगमेश्वर बस स्थानक आणि देवरुख मार्गावर दोन गाड्यांमध्ये कत्तलीसाठी दाटीवाटीने गुरे भरून जाणाऱ्या दोघांना संगमेश्वर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले असुन दोन गाड्या आणि गुरे ताब्यात घेतलेली आहेत. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेच्या दरम्यान पोलीसांनी ही कारवाई केली.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन कामेरकर, आकाश लांडगे, भाऊ मोहिते यांनी पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
शाहूवाडी कोल्हापूर येथील शिवाजी धोंडीराम शिंदे , याने त्याचे ताब्यातील ४०७ टाटा टेम्पो नं . एच ० ९ ईएम १६५४ मध्ये ६ बैल दाटीवाटीने भरून ४०७ टाटा टेम्पो गाडीचा इन्श्युरन्स परवाना नसताना तसेच सुधीर गणपत सावर्डेकर , वय ५३ वर्षे , रा . असुर्डे , सावर्डेकरवाडी , ता . चिपळूण , सध्या रा . आरवली , बाजारपेठ , ता . संगमेश्वर , जि . रत्नागिरी याचे जवळ शिकाऊ चालक परवाना असताना सोबत शेजारी परमन्ट चालक • न बसविता तसेच वाहनास पुढील व मागील बाजूस दिसेल असा एल बोर्ड न लावता त्याचे ताब्यातील बोलेरो पिकअप गाडी नं . एच ०८ एपी ८०८२ या गाडीमध्ये ५ बैल दाटीवाटीने भरलेल्या स्थितीत घेऊन जात होता. शिवाजी शिंदे आणि सुधीर सावर्डेकर हे आपआपल्या ताब्यातील गाडीच्या हौद्यामध्ये दाटीवाटीने कमी जागेत दोरीने जनावरे बांधुन , जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसतांना गैरकायदा कत्तलीसाठी वाहतुक करीत असल्याची खबर संगमेश्वर पोलिसांना मिळाली होती. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ मोहिते सचिन कामेरकर ,आकाश लांडगे, पंदेरे, किशोर जोयशी, सोमा आव्हाड, बरगाळे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेच्या दरम्याने संगमेश्वर बस स्थानकाच्या जवळ देवरुख मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये दोन गाडया तसेच 11 बैल असा सुमारे 8 लाख 74 हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आलेली आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत
फोटो ओळी- संगमेश्वर पोलिसांनी कत्तलीसाठी घेऊन जाणारी गुरे आणि पकडलेल्या गाडया