संगमेश्वर : रत्नागिरी एकीकडे कडाक्याचा उष्मा सुरु असतानाच अशातच जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, राजापूरमधील काही शुक्रवारी भागामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये चिपळूण टेरव येथे एका घरावरील पत्रेउडाले तर संगमेश्वरात दाभोळेकनकाडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरांचे लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणात८ ते ११ एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची ८ एप्रिल रोजी कोकणात तुरळक शक्यता वर्तवण्यात आली आहे.