संगमेश्वर देवरुख साखरपा राज्य मार्ग बनला धोकादायक, रस्त्यावर जीवघेणे खड्डे…जीवघेणे खड्डे आणि खडीमुळे अनेक दुचाकीचा अपघात…बांधकाम मंत्र्यांना निवेदन देणार…तातडीने कार्यवाही करण्याची मागणी…

Spread the love

*करोडो रुपये खर्च करूनही संगमेश्वर देवरुख साखरपा रस्ता खड्ड्यांचे जाळे निर्माण होणे हे बांधकाम खात्याला दिसत नाही का?*

*अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची त्याचे काम करणाऱ्या कंपनीला बॅक लिस्ट मध्ये टाकण्याचे मागणी…*

*संगमेश्वर /प्रतिनिधी-* नव्याने केलेल्या संगमेश्वर देवरुख साखरपा मार्गाची पूर्णतः दुरवस्था झाली असून या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या एका बाजूला जमा झालेली बारीक खडी यामुळे गत आठवड्यात तीन दुचाकीस्वार घसरुन पडले आहेत . वाहनांना अपघात होवून प्रवाशांचा जीव जाण्याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे .

संगमेश्वर देवरुख साखरपा या राज्यमार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांनी तातडीने पाहणी करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली असून या पाहणीनंतर त्यांनीच हा मार्ग किती धोकादायक झाला आहे याचा निष्कर्ष काढावा अशी अपेक्षा वाहनचाकांनी व्यक्त केली आहे . जून महिन्यामध्ये भर पावसात या मार्गावर काही ठिकाणी सीलकोटचे काम करण्यात आले . पावसामुळे या सीलकोटच्या कामाचा पूर्णत: फज्जा उडाला असून सीलकोट नंतर मारलेली सर्व बारीक रेव रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमा झाली आहे . रात्रीच्या वेळी ही बारीक रेव दुचाकीच्या अपघातास कारणीभूत ठरत आहे . सदर बारीक रेव तातडीने बाजूला करणे आवश्यक असताना याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .

*अंदाजे 32 करोड रुपये खर्च करू नये रस्त्याची दुर्दशा.. काम करणाऱ्या कंपनीला बॅक लिस्ट मध्ये टाकण्याची मागणी…*

देवरुख साखरपा संगमेश्वर रस्ता दोन वर्षापूर्वी पूर्ण झाला आहे रस्ता करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही कहानी केलेली नाही. रस्त्याचे काम करण्यापूर्वी मजबुतीकरण करण्यासाठी रस्ता करताना रस्त्याचा बेस मजबूत करणे गरजेचे होते. परंतु बेसचे काम करण्यात आले नाही त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने तूप लावण्याचे काम फक्त केले आहे. त्यामुळे सदरचा रस्ता फक्त दोन वर्षांमध्ये हे हाल झाले आहेत. रस्त्याचे काम न करताच बिले काढण्यात आले आहेत. सदर विषयाची चौकशी व्हावी अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे. सदर कंपनीला बॅक लिस्ट करावे अशी आग्रहाची मागणी आहे. सदर विषय हा चिंताजनक असून अनेक सामाजिक कार्यकर्ते लवकरच या संदर्भ मध्ये आमरण उपोषण करणार असल्याचे बोलण्यात येत आहे.

*संगमेश्वर देवरुख साखरपा रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात जीवघेणे खड्डे*

संगमेश्वर ते नवनिर्माण महाविद्यालया दरम्यान एका अवघड वळणार संगमेश्वरकडे जाताना डाव्याबाजुला एक लांबरुद जीवघेण्या खड्यात आत्तापर्यंत तीन दुचाकी आपटून अपघात घडला असून सुदैवाने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले नाहीत . पावसाच्या पाण्याने हा खड्डा भरलेला असल्याने वाहनचालकांच्या लक्षात येत नाही . वेगातील चारचाकी कार अथवा रिक्षा या खड्ड्यात आपटल्यास पलटी होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे .

वळणावरील हा जीवघेणा खड्डा तातडीने न बुजवल्यास येथे घडणाऱ्या अपघाताबाबत बांधकाम विभागास  जबाबदार धरले जाणार असल्याचा इशाराही वाहन चालकांनी दिला आहे .

संगमेश्वर मारुती मंदिराजवळ तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे . या ठिकाणी केवळ खड्डे बुजवून रस्ता सुरळीत होणार नसून येथील मोठा पॅच नव्याने करणे आवश्यक बनले आहे . अशीच स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे . ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे तातडीने बुजवणे आवश्यक असल्याचे वाहनचालकांनी नमूद केले आहे .

*कोसुंब घाटीतील कडा धोकादायक*

कोसुंब घाटात शेवरवाडी बस थांब्याजवळ दरीकडील एक बाजू ढगरली असून येथे प्लॅस्टिक पट्ट्या आणि बांबू तसेच दगडांनी वाहनचालकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे . हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून अशा ठिकाणी लोखंडी रेलींग आणि लाल सिग्नल लावणे आवश्यक असताना बांधकाम विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांनी स्वतः याबाबत लक्ष घालावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे .

*बांधकाम मंत्र्यांना निवेदन देणार*

संगमेश्वर देवरुख साखरपा मार्गाच्या कामाचा निकृष्ट दर्जा , सद्यस्थितीत पडलेले जीवघेणे खड्डे , खड्डे आणि रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेली बारीक रेती यामुळे होणारे अपघात याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख दुर्लक्ष करत असल्याबाबत आता वाहन चालकांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना आवश्यक त्या पुरावे आणि छायाचित्रांसह सविस्तर निवेदन देणार असल्याचे जाहिर केले आहे .

*बावनदी- देवरुख -मारलेश्वर रस्त्याचे काम एकाच वेळी होऊन एकही खड्डा सदर रस्त्यावर नाही एकच डिपार्टमेंट असताना दोन रस्त्यांमध्ये एवढा फरक कसा?*

संगमेश्वर देवरुख साखरपा राज्य मार्ग काम चालू असताना एकाच वेळी बावनदी देवरुख मारलेश्वर याही राज्यमार्गाचे काम चालू होते. सदरचा रस्त्याचे काम रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात चांगले झालेले असून एकाच सार्वजनिक बांधकाम विभाग संगमेश्वर या विभागाने दोन्ही रस्त्याचे काम त्यांच्या देखरेखी खाली झाले आहे. तरीही संगमेश्वर देवरुख साखरकर रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे का झाले हा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. सदरच्या रस्त्याचे काम एवढे निकृष्ट दर्जाचे झाले आहे की रस्ता पूर्ण खड्डेमय झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग  संगमेश्वर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सदर विषयाची सखोल चौकशी करणे फार गरजेचे आहे. कॉलिटी कंट्रोल अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे असे सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. कॉलिटी कंट्रोल अधिकाऱ्याने काम तपासून जागेवर उभारून करून घेतले असते तर सदरचा रस्ता खराब झाला नसता. अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे असे रस्ते खराब होतात. करोडो रुपये खर्च करूनही रस्त्याचे बांधकाम दर्जा या प्रकारचा असेल तर ग्रामस्थ गप्प का बसतात आहे प्रश्न उपस्थित राहत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page