दिवाळीत भाऊबीज फटाके फोडत साजरी करायची आहे. – मा. आमदार बाळ माने यांची लाडक्या बहिणींना साद
संगमेश्वर/ मकरंद सुर्वे- भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी (द.) व दि यश फाऊंडेशन संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगमेश्वर येथील स्वाद हॉटेल येथे मंगळागौरी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. सुदूर ग्रामीण भागातील १४ संघांनी या स्पर्धेत सहभाग ज्यामध्ये तब्बल १७५ हुन अधिक महिलांचा विक्रमी समावेश होता.
स्पर्धेचे परीक्षण नृत्यविशारद गौरी साबळे यांनी तसेच तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. अपर्णाताई भिडे ;, डॉक्टर अमित ठाकरे ,सतीश पटेल उपाध्यक्ष राजेश आंबेकर, योगेश मुळे,, प्रशांत रानडे सहभागी संघांनी पारंपरिक सादरीकरण करतानाच विविध सामाजिक प्रश्नांना स्पर्श करत त्यामध्ये ‘स्त्री’च्या भूमिकेविषयी सकारात्मक विचार करण्यासाठी उपस्थितांना प्रवृत्त केले.
मा. आम. तथा रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख मा. बाळ माने यांचे आयोजक, प्रेक्षक व स्पर्धकांनी केलेल्या स्वागताने कार्यक्रम रंगतदार झाला. त्यानंतर आभार मानताना ते म्हणाले, “ग्रामीण भागातील महिलांचे एकत्रीकरण व्हावे, विचारांचे आदानप्रदान व्हावे आणि स्थानिक महिला स्वयंपूर्ण होण्यासाठी सज्ज व्हाव्यात यासाठी अशा स्वरूपाचे पारंपारिक कार्यक्रम आपण आयोजित करतो. वाण लुटण्यासाठी अन्य कार्यक्रमांचे नियोजन आपल्या पूर्वजांनी आधीच करून ठेवले असल्याने अमुक एक मिळणार म्हणूनच महिला कार्यक्रमांना येतात अशा दुष्प्रचाराला या ठिकाणी जमलेल्या मायमाऊलींच्या तुडुंब गर्दीने चपराक हाणली आहे. आता लाडक्या बहिणींना सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यातून गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करा. दिवाळीत भाऊबीज फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरी करायची आहेच तेव्हा तुमचा हा लाडका भाऊ पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना भेटायला येईल. विकास, स्थैर्य, सुबत्ता आणि सुरक्षा या गोष्टींवर आपल्या सर्वांना एकमेकांच्या साथीने करायचे आहे.”
यावेळी “लाडक्या बहिणीचा, लाडका भाऊ… बाळाभाऊ, बाळाभाऊ” अशा उत्स्फूर्त घोषणा महिलांनी दिल्या. सर्व संघांचे सादरीकरण झाल्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. अमृता ग्रुप नावडी, संगमेश्वर यांनी या स्पर्धेच्या चषकावर आपले नाव कोरले. वरदानदेवी, माभळे-जाधववाडीच्या महिला द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या तर तृतीय क्रमांक शारदादेवी नवरात्रोत्सव महिला मंडळ कोळंबे (गदम) यांनी पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून रतनेश्वर कोळंबे-भरणकरवाडी, हनुमान सेवा मंडळ, परचुरी-सुतारवाडी या संघांना पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त सहभागी सर्व संघातील महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आयोजक भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी (द.) जिल्हा सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये व मा. जि. प. सदस्या तसेच रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा महिला मोर्चा संयोजिका सौ. दीपिकाताई जोशी, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तसेच सौ. शीतल दिंडे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले केले. संगमेश्वर (उ.) तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ता लुका कार्यकारिणीतील कार्यकर्ते तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उत्तम साथ देत दिमाखदार कार्यक्रम संपन्न करण्यात आपले योगदान दिले.