चिपळूण ता.- दिनेश आंब्रे वीर गावचा सुपुत्र व गणेश मूर्ती कार संदिप तानाजी जावळे याने वीर गावी सांगु माती पासुन चाळीस गणेश मूर्ती पहिल्याच वर्षी आपल्या कारखान्यात घडविल्या आहेत बालपणी चे इयत्ता पाचवी पर्यंत चे शिक्षण त्यांनी जि पण मराठी शाळा वीर येथे घेतले वडील तानाजी हे शेतकरी होते प्रतिकुल परिस्थिती असल्यामुळे संदीप ला फारसे शिक्षण घेता आले नाही .
आई संगीता हिची फार इच्छा होती माझा मुलगा नामवंत कलावंत व गुणवत्ता व्हावा याला अनुसरून स्वताच्या गावा जवळील कारखान्यात जाऊन छोटे छोटे गणपती काढण्यात सुरुवात केली काही वर्षांनंतर वहाळ गावी जाऊन प्रसिद्ध मुतीकार शांताराम महादेव कदम यांच्या कारखान्यात हाती गणपती काढणे व रंग कला यांचे शिक्षण घेतले संदीप जावळे यांना कारखान्याच्या कामात त्यांच्या पत्नी चा मदतिचा हात असतो.
कारखान्यात एक ते तीन फुट चाळीस गणपती साकारले आहेत गुरुवर्य श्री शांताराम कदम व नवोदित कलाकार स्वपनील कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे पचयकौसितुन कलेचे कौतुक केले जात आहे संदीप जावळे यांनी परिस्थितीवर मात करून संसाराचा डोलारा उभारला आहे व गणेश मूर्ती कला जोपासत आहेत हे विशेष सांगावेसे वाटते..