🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 रत्नागिरी | जानेवारी ३१, २०२३.
◼️ कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथे पीर बाबर शेख यांचा उरूस होतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी फार लांबून येत असतात.
◼️ यंदा ५ व ६ फेब्रुवारी रोजी दोन दिवस हा उरुस साजरा होणार आहे, येणाऱ्या भाविकांना जर आकस्मिक काही वैद्यकीय उपचाराची गरज पडली तर प्रथमोपचार म्हणून संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी यांचे तेथे रुग्ण मदत केंद्र सुरु राहणार आहे.दरवर्षी अशा प्रकारची सेवा संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी करीत असते. तरी या प्रथमोपचार केंद्राचा गरज भासल्यास लाभ घेण्याचे आवाहन एनजीओचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी केले आहे.