
संगमेश्वर , दिनेश अंब्रे-
संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी ओझरखोल येथील तंटामुक्त अध्यक्ष श्री. मुरलीधर वाडकर, आई ममता मुरलीधर वाडकर यांची सुकन्या कु. समीक्षा मुरलीधर वाडकर ही नवोदित युवा गायिका बारावी पर्यंतचे शिक्षण पैसाफंड कॉलेज संगमेश्वर येथे घेतले ,पुढे गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी
येथे आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे.
गाण्याचे शिक्षण प्रथम सौ दिप्ती गद्रे मॅडम कडे घेऊन त्यानंतरचे पुढील शिक्षण संध्या सुर्वे यांच्याकडे घेत आहे.संगीताची आवड वयाच्या आठ वर्षापासुन आहे. गायन कलेसाठी सातत्याने आई वडिलांचे प्रोत्साहन मिळते. रत्नागिरी ,चिपळूण, महाड ,मुंबई, सातारा, पाटण , कोल्हापूर, गोवा, गुजरात येथे आपल्या गाण्याने समीक्षा वाडकर हिने लोकांची मने जिंकली आहेत .गाण्यात आदर्श म्हणून लता मंगेशकर यांना मानते .
सिने अभिनेते , गायक यांच्या सोबत कार्यक्रम केले आहेत. सुप्रसिद्ध सिनेगायक स्वप्निल बांदोडकर , अंशुमन विचारे, विजय गोखले, संजय मोने, सविता मालपेकर ,शर्मिष्ठा राऊत अश्या सिनेस्टार सोबत काम करून आपल्या गावाचे तसेच आई वडिलांचे नाव मोठे करत आहे.
समीक्षा वाडकर हिने आपल्या गाण्यात प्रगती करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे हे ध्येय ठेवले .