
*संगमेश्वर: – दिनेश अंब्रे-* परचुरी गावातील प्रतिष्ठित नागरिक संदीप दूदम यांची कन्या कु. सलोनी दूदम (इयत्ता ११ वी) सध्या भाईंदर (मुंबई) येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तीला खो-खो खेळाची विशेष आवड असून, नुकतीच तिची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सलोनी दूदम गावाला आल्यावर समाज सेवा मंडळ, दुदमवाडी यांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार दिपक लिंगायत यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन संपन्न झाला. तसेच कोंड असुर्डे गावाचे सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांनी तिला जागर, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन तिचा गौरव केला.
हा सत्कार दुदमवाडीच्या वार्षिक समारंभात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष वसंत दूदम, उपाध्यक्ष दिनेश दूदम, डॉ. विनायक पेठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, उपसरपंच प्रदीप चंदरकर,डॉ. लिंगायत, पत्रकार मुझम्मिल काझी, पत्रकार एजाज पटेल, संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष वहाब दळवी, पत्रकार दिनेश अंब्रे, माजी सैनिक अनंत शिंदे आदींचा समावेश होता.
सत्कार समारंभात सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.