कुटुंबियांचा सतत छळ करणाऱ्या सख्ख्या भावाचा मित्राच्या मदतीने डोक्यात गोळी झाडून केला खून.

Spread the love

लातूर- कुटुंबियांचा सतत छळ करणाऱ्या सख्ख्या भावाचा मित्राच्या मदतीने डोक्यात गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये समोर आली आहे. यातील मित्राला लातूर पोलिसांनी पिस्तूल व मोटारसायकलसह अटक केली असून अटकेतील दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, लातूर तालुक्यातील भातखेडा येथील सूरज गोविंद मुळे (वय २५) हा कुटुंबातील आई, बहीण आणि भावाला दारू पिऊन सतत छळत होता. दरम्यान, या छळाला कंटाळून भाऊ धीरज हा आई-बहिणीला घेऊन पुण्याला गेला होता. तेथे त्याने सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी स्वीकारली होती. दरम्यान, दारुडा भाऊ सतत आपल्याला छळत असल्याचा राग मनात खदखदत होता. त्यातच त्याने सख्ख्या भावाचा गेम करण्याचा कट पुण्यात रचला. त्यासाठी गावठी बनावटीचे पिस्टल त्याने खरेदी केले.

भातखेडा येथील घरात सूरजवर पाळत ठेवण्याची, रेकी करण्याची जबाबदारी त्याने मित्र अमर अशोक गायकवाड (२२) याच्यावर सोपविली. पाळत ठेवून सोमवारी रात्री पुण्यातून तो लातुरात आला. मित्र अमर गायकवाड याची मोटारसायकल घेऊन ते दोघेही भातखेडा येथे आले आणि भाऊ धीरज याने झोपेत असलेल्या सूरजच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर तो पुन्हा रातोरात पुण्याला निघून गेला. गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हे मित्राच्या घरी लपविल्याचे पोलिस तपासात समोर आले. पुण्यातून पिस्टल आणि लातुरातून मित्र अमर अशोक गायकवाड याला मोटारसायकलसह अटक केली आहे.

कट रचण्यापासून ते फत्ते करण्यापर्यंतची माहिती धीरजने मित्र अमर गायकवाडला दिली असून, मैत्रीपाेटी अमरने साथ दिली. गुन्ह्यात वापरण्यासाठी दुचाकी दिली. गाोळी झाडण्यासाठी धीरज घरात शिरला, त्यावेळी अमर बाहेर देखरेख करत हाेता. खून झाल्यानंतर पुन्हा धीरजला लातुरात आणून साेडण्याचे कामही अमरने केले, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी धीरज हा पुण्यातील एका खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. स्वत:चे लग्न जमविण्यासाठी गावाकडे जायचे आहे, असे सांगत त्याने रजा घेतली होती. रात्रीतून पुणे येथून लातूरला आला. मित्र अमरच्या मदतीने सख्खा भाऊ सूरजच्या डाेक्यात गाेळी झाडली. गुन्ह्यातील गावठी पिस्टल पुण्यातील एका मित्राच्या घरात काेणतीही माहिती न देता ठेवले, असेही पोलिसांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page