संत तुकाराम महाराज पालखीचं प्रस्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन ….

Spread the love

विठुरायाचा गजर करत संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरच्या दिशेनं प्रस्थान केलं….

पुणे : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखीनं बुधवारी पंढरपूरकडं प्रस्थान केलं. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. राज्याचे मुख्य्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा आणि आरती झाली.

महापूजेनंतर इनामदार वाड्यातील मुक्कामाकडं प्रस्थान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. पूजेनंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदंगाच्या गजरात दंग झाले. महापूजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडं प्रस्थान केलं.




मोठ्या संख्येनं वारकरी दाखल : टाळ-मृदंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखीनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी पंढरपूरकडं प्रस्थान केलं. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते.

दिग्गजांची उपस्थिती : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प.विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page