
▪️ईडीच्या नोटीस साधू-संतांना येत नसल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ईडीच्या कारवाईबाबत भाष्य केलं आहे. दरम्यान, सत्तेचा गैरवापर करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर नारायण राणे यांनी थेट भाष्य करीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेल्या नोटीसीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.
नारायण राणे म्हणाले,.
▪️राज्यातल्या ज्या नेत्यांना ईडीच्या नोटीसा येतात. त्या नोटीशीमध्ये कशासाठी नोटीस पाठवलीय, विविध कलमांच्या आधारे नोटीस पाठवलीय, यासंदर्भातील उल्लेख असतो. नोटीसीत स्पष्टपणे पाठवण्याचं कारण दिलं जातं. त्यामुळे देवळातल्या साधूला ईडीच्या नोटीसा दिल्या जात नसल्याचं म्हणत त्यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.
▪️राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
▪️आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
▪️याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांनी यापूर्वी केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीला सामोरे गेलेले आहेत. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांकडून ईडीचा गैरवापर केला जात असल्याच आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
▪️दरम्यान, आम्हीही सत्तेचा गैरवापर पहिला आहे. मी त्याचा बळी आहे. ठाकरे गटाचे अनिल परब सांगत होते, राणेंना अटक करा, यासंदर्भातल्या रेकॉर्डिंग माझ्याकडं असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला आहे.