धामणी येथील हॉटेल श्रद्धाचे मालक प्रवीणशेठ वाकणकर यांचे दुःखद निधन…

Spread the love

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील प्रसिद्ध हॉटेल श्रद्धाचे मालक,भारतीय जनता पक्षाचे जूने आणि ज्येष्ठ नेते, धामणी गावचे माजी सरपंच व समाजसेवक प्रविण नारायण वाकणकर (58) यांचे आज पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

दत्तभक्त प्रविण शेठ अतिशय सयमी व शांत स्वभाव, असणारे हसतमुख व्यक्तिमत्व होते. त्यांच्या मनमिळाऊ व मिश्किल स्वभावामुळे ते सर्वपरीचीत होते. त्यांच्या पश्चात मुलगा, पत्नी, सून, भाऊ आदी परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 9 वाजता धामणी येथील राहत्या घरातून निघणार आहे. प्रविणशेठ वाकणकरांच्या अकाली निधनामुळे धामणी परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page