
लांजा: लांजा पोलिस ठाणे येथे पोलिस हेडकॉन्स्टेबल पदावर सेवेत असणारे आणि मूळ संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथील सचिन भुजबळराव यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली. राज्य पोलिस विभागात गेली २९ वर्षे भुजबळराव कार्यरत आहेत.
भुजबळराव यांचा १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक पदकाने सन्मान झाला असून, नुकतीच ४ जूनला पोलिस हेडकॉन्स्टेबल पदावरून त्यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली. लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे व अरविंद कांबळे यांनी भुजबळराव यांना स्टार लावले.