विधवा महिला पेन्शन योजनेसाठी केले विशेष सहकार्य
दिवा (टि सचिन) सध्या दिवा प्रभाग समिती येथे विधवा महिला पेन्शन योजना व महिला बालविकास कल्याण योजनेचे फार्म भरण्यास सुरवात झाली असून ज्या महिलांना सदरचे जमा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत अश्या महिलांना दिव्यातील समाजसेवक तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष श्री रोशन भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावतीने फार्म भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.भारतीय जनता पार्टीच्या या कार्यामुळे दिव्यातील महिला सबलीकरणास मदत होत आहे.
दिव्यासारख्या ठिकाणी आज अनेक विधवा,परितक्त्या,घटस्फोटीत तसेच निराधार महिला आहेत.आजारपण,अपघाती मृत्यु,व्यसनाधिनता या कारणांमुळे अनेकांचे पती तारुण्यात गेलेले आहेत.काहींना अपघात झाला असल्यास अश्या महिलांना विम्याचे पैसेही मिळत नाहीत.मुलांचा शिक्षणाचा खर्च मोठा असल्याने मुलांना शाळेत कसे टाकायचे असा प्रश्न आहे.काही महिला या धुणीभांडी करुन आपला उदरनिर्वाह करीत असतात.त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कर्ज किंवा आर्थिक मदत घ्यावी लागते.त्यामुळे बहुतांश महिला उपेक्षित जिणे जगत आहेत.
त्यामुळे अश्या निराधार महिलांना केंद्र सरकारतर्फे मासिक 900 रुपयांपर्यंत पेन्शन योजना राज्यात लागू आहे.मात्र शिक्षणाअभावी काही महिलांना अर्ज कसे करावेत याचीही माहिती नसल्यामुळे त्यांना आतापर्यंत लाभ घेता आलेला नाही.त्यामुळे अनेक महिला यापासून वंचित राहील्या आहेत.अश्या महिलांना पेन्शन मिळावी यामुळे दिव्यातील समाजसेवक तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष श्री रोशन भगत आणि दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण यांनी या महिलांना विशेष सहकार्य केले आहे.त्याच्या महिला सबलीकरणाच्या उदात्त हेतूमुळे अनेक महिलांना आभार मानले आहेत