
श्रीकृष्ण खातू / धामणी- दरवर्षी वाट पाहायला लावणारा पाऊस अवकाळी रूपाने लावणीवेळी जुलै महिन्यात पडणाऱ्या धोधो पावसाप्रमाणे पडला.व त्यामुळें पावसाळ्यासाठी करावयाची साठवण कामे शिल्लक राहिली.
तेवढ्यातच रोहीणी सुरु झाले. परंतु पाणीच पाणी झालेल्या शेतात पेरणी करतांना शेतकरी कसरत करत असल्याचे दिसले.
ट्रॅक्टरने नांगरणी अलिकडे होत असली तरीही अजूनही बैलांचे नांगर बघायला मिळत आहे.
पेरणीचे रोहीणी नक्षत्र सुरु झाल्यामुळें संगमेश्वर धामणी, गोळवली तुरळ परिसरात शेतकरी प्रत्यक्ष बियाणे पेरणी करू लागला आहे.