दिवा : प्रतिनिधी दिवा स्टेशन परिसरात प्रवाशांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता दिवा पूर्वेला साबे रोड व मुंब्रादेवी रॉड परीसरात पालिकेच्या माध्यामतून सुसज्ज सुलभ शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
दिवा स्टेशनचा ज्या पद्धतीने विकास होत असताना दिवा स्टेशन बाहेर नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी वाढती गर्दी लक्षात घेऊन दिवा पूर्वेला सुलभ शौचालय ठाणे महानगरपालिकेने बांधण्यात यावे, अशी मागणी भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे. या ठिकाणी शौचालय झाल्यास याचा फायदा शेकडो नागरिकांना होईल असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
जाहिरात