दिव्यात रस्त्यावर फेरीवाले बसवता आणि रस्त्याकडील वाहने मात्र उचलता, आधी दिव्यात नागरिकांना पार्किंग सुविधा द्या, ठाकरेंच्या शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांची वाहतूक विभाग व पालिकेकडे मागणी
ठाणे : निलेश घाग दिवा शहरात पालिका व पोलीस प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था केलेली नाही मात्र रस्त्यावर फेरीवाले बसवून ठेवले आहेत. दुसरीकडे आपली वाहने रस्त्याकडेला पार्क करणाऱ्या नागरिकांच्या गाड्या मात्र पोलीस येऊन उचलत असल्याने नागरिकांत संताप असल्याचे सांगत ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिव्यात पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
दिवा शहरात एकाही रस्त्याला पालिकेच्या माध्यमातून किंवा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून पार्किंग ची सुविधा उपलब्ध नाही. खरे तर रस्त्याच्या कडेला नागरिकांना पार्किंग उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे. मात्र दिव्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसविण्यात आले आहेत.
काय म्हणाले रोहिदास मुंडे… पहा सविस्तर
तसेच रोड टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना मात्र वाहने पार्क करायला जागा नाही. कामाला जाणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पार्क केली तर ती उचलून नेली जातात.दिव्यात एकतर तुम्ही पार्किंग उपलब्ध करून देत नाहीत आणि रस्त्यांवर फेरीवाले बसवता मग सामान्य नागरिकांनी त्यांच्या गाड्या पार्क कुठे करायच्या?असा प्रश्न रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे. पालिका व पोलीस प्रशासनाने दिव्यात लवकरात लवकर पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
जाहिरात