
हिंगोली | एका वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून भरदिवसा तिला लुटण्यात आले. चोरट्यांनी तिची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लुटले. येडूत येथील रहिवासी ६५ वर्षीय व्दारकाबाई बळीराम भुक्तर या खरेदीसाठी आल्या होत्या. मंगळवारी दुपारी दोन वाजता अज्ञात मुलांनी महिलेशी बोलून मोफत धान्य देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी एकांतात महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला लुटले.
तोंडावर स्प्रे मारताच व्दारकाबाई भुक्तर बेशुद्ध पडल्या. संधी साधून चोरट्यांनी ६० हजार रुपये रोख आणि २५ हजार रुपयांचे दागिने हिसकावले. या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.