साई रुचिता मोटार ट्रेनिंग स्कुल नेरळ व प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम संपन्न….

Spread the love

अपघातग्रस्तासाठी देवदूत बना,परिवहन अधिकारी विजया चामे यांचे मार्गदर्शन, रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नागरिकांचे प्रबोधन…

नेरळ: सुमित क्षीरसागर – रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी शासन, परिवहन विभाग शक्य ते प्रयत्न आहे. मात्र रस्त्याने प्रवास करताना अपघात झालेला दिसला तर आपण काय कराल ? तर त्या अपघातग्रस्तासाठी रुग्णवाहिकेची वाट न पाहता मिळेल त्या वाहनाने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करा. अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्याची कुठलीही चौकशी किंवा पोलीस प्रशासन त्याच्या मागे लागत नाही. मात्र तुमची थोडीशी मदत त्या जखमी व्यक्तीचे प्राण वाचवू शकतात. तेव्हा फोटो व्हिडीओ काढणाऱ्यांपेक्षा त्या अपघातग्रस्तासाठी देवदूत बना असे मार्गदर्शन परिवहन अधिकारी विजया चामे यांनी केले. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानानिमित्त त्या नेरळ येथे बोलते होत्या.

शासनाचे रस्ता सुरक्षा अभियान सुरु करण्यात आले आहे. या निमित्त नेरळ, धामोते याठिकाणी साई रुचिरा मोटार ट्रेनिंग स्कुल व विभागीय परिवहन कार्यालय पनवेल यांच्या माध्यमातून दिनांक ३० जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. यामध्ये नेरळ विद्या विकास मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करणारा चांगला व्यक्ती, यासह अपघातग्रस्तांना आपण कशी मदत करू शकतो. कुठल्या वयात विद्यार्थ्यांना परवाने मिळतात, व्यसनमुक्ती प्रथमोपचार आदींची माहिती सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुयोग पाटील यांनी दिली. तर धामोते येथे रिक्षा टॅक्सी चालक यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विजय चामे म्हणाल्या कि रिक्षा टॅक्सी चालक यांनी प्रवासी वाहतूक करताना आपल्या प्रवाशांशी अदबीने वागलं पाहिजे समाजात आपलीही एक प्रतिष्ठा असून ती जपली गेली पाहिजे त्यामुळे कट मारणे, प्रवाशांना अतिरिक्त भाडे आकारून लुटणे असे प्रकार घडत कामा नये, यासह आपण एखाद्या अपघातग्रस्ताचा जीव वाचवून त्याच्यासाठी देवदूत बानू शकता त्यामुळे प्रसंगावधान राखायला आपल्याया यायला हवं. जिथे गरज लागेल तिथे परिवहन विभाग आपल्या मदतीला असेल. तसेच यावेळी ज्या वाहनचालकांकडून नियम मोडण्यात आले त्यांचा गुलाबपुष्प देऊन प्रबोधन करण्यात आले. तर कर्जतच्या अग्निशमन दलाने रिक्षा टॅक्सी यात असलेल्या अग्निशमन यंत्राचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक दिले.

यावेळी विभागीय परिवहन विभाग पनवेलच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विजया चामे, सुयोग्य पाटील, पोलीस उपनिरीक्षक नरेश नांदगावकर, हवालदार नितीन अहिरे, अनघा पाटील, शेखर मोरे, डॉ. सचिन वाणी, कर्जत अग्निशमन दलाचे प्रदीप हिरे, मारुती रोकडे, साई रुचिता मोटार स्कुलचे नरेश साळुंके, राहुल साळुंके, नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष यशवंत मोरे, महेंद्र बॅचम, संतोष भोसले, जय मल्हार रिक्षा संघटनेचे उपसचिव भगवान जामघरे, खजिनदार श्रावण जाधव, लक्ष्मण चंचे आदी यावेळी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page