दिनोदय वस्तू भंडार देवरूख ते पोलीस स्टेशन देवरूख रस्त्याची दुरवस्था झाली असून संबंधित ठेकेदार यांनी नगरसेवक,व अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 3 वर्षाची हमी दिली होती असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते श्री शेखर जोगळे यांनी केला आहे.
*एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आरोप त्यानी केले असून या पत्रकात ते पुढे म्हणतात की*
“गेल्या वर्षी 25 एप्रिल 2023 रोजी मुख्य रस्त्यावरील पॅचिंग आणि तहसीलदार कार्यालय रोड च्या कामाच्या दर्जा बाबत काही प्रश्न उपस्थित केले होते त्यावर आम्हाला माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ चे पदाधिकारी व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते,यांना रस्त्याची पाहणी करायचे आमंत्रण दिले गेले आम्ही कामाची पाहणी करण्यास गेलो असता संबंधित ठेकेदार आमच्या शी बोलताना सर्वांसमक्ष 3 वर्ष रस्त्यावर खड्डा पडणार नाही असे बोलले होते. आता दीड वर्ष पण झाले नाही. आणि रस्ता खड्डेमय झाला.
जेव्हा काम सुरू होते तेव्हा एका ग्रुप वर त्याच्या दर्जाबाबत प्रश्न विचारले होते
देवरूख शहरातील विकास कामांचा दर्जा तपासण्यात यावा. शहराची परिस्थितीला जबाबदार कोण?
देवरूख शहरातीलच नाही तर संगमेश्वर तालुक्यातील अनेक विकास कामांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.परंतु जनतेचे वाली कोणीही नाही त्यामुळे अराजकता माजली आहे.विशिष्ठ व्यक्तींची मक्तेदारी आहे. याला लोकप्रतिनिधी व अधिकारी जबाबदार आहेत.
रस्त्याला पाच वर्षाची हमी असताना दोन महिनेही रस्ते टिकत नाहीत.याचाच अर्थ असा की कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे.असे आमचे मत आहे.