मुंबई गोवा हायवेवर संगमेश्वर निढळेवाडी येथे कार आणि रिक्षाचा भीषण अपघात,अपघातात रिक्षा चालक अस्लम बोट यांचा दुर्दैवी मृत्यू, हायवे वर अपघात चालूच…

Spread the love

संगमेश्वर प्रतिनिधी- मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील निढळे वाडी येथे रिक्षाला चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षा रस्ता सोडून दरडी वर कलंडुन झालेल्या अपघातात संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते येथील मूळ गाव  असलेले व सध्या रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले अस्लम सुलेमान बोट वय वर्ष 54 यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी शबाना अस्लम बोट यांच्या डोक्याला जबर मार लागला हा अपघात शनिवारी संध्याकाळी झाला.

गावी आलेल्या अस्लम बोट वर काळाचा घाला…

           
संगमेश्वर कळंबस्ते आज शनिवारी दरग्याचा उर्स असल्याने रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले अस्लम बोट व  त्यांची पत्नी शबाना बोट रिक्षा ने कळंबस्ते येथे शनिवारी आले होते. व संध्याकाळी पुन्हा त्यांच्या ताब्यात असलेली रिक्षा क्रमांक MH 08E 7089 घेऊन स्वतः रत्नागिरी येथे जात असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या MH08 अग 2687 क्रमांकच्या रेनौल्ट या चारचाकी कार ने जोरदार धडक दिल्याने रिक्षा रस्ता सोडून थेट दरडीवर कळंडली व येथेच दबा मारून बसलेल्या अस्लम बोट याच्या वर काळाने घाला घातला.तर त्यांच्या पत्नी शबाना यांच्या डोक्याला जबर मार लागला.

         
अपघात कार चालक पसार…

पाठीमागून रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचे तर नुकसान झालेच परंतु कार च्या पुढील बाजूचे झालेले नुकसान पाहता कारचा वेग आणि रिक्षाला दिलेली धडक याचा अंदाजच काढता येणार नाही. तर अपघात घडताच कार चालक हा तेथून पसार झाला आहे.

       
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी…

 
अपघात झाल्यानंतर रिक्षातील अस्लम बोट व त्यांच्या पत्नी यांना ॲब्युलन्सने  संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यापूर्वीच अस्लम बोट यांचे निधन झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी काही वेळेतच सर्वत्र पसरली आणि संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आत व बाहेर अनेकांनी गर्दी. सर्वत्र अक्षरशः रडारड व  शोककळा पसरली.

             
तणावपूर्ण वातावरण…

बेदरकार वाहन चालवून अपघातास जबाबदार असलेला चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने  ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या लोकांनी कार चालकाला ताब्यात घेण्याच्या  मागणीला जोर धरला व एकच बरोबर उडाली मात्र संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे यांनी उपस्थिती यांना शांत होण्याचे आवाहन व विनंती केली त्या विनंतीला व आवाहनाला उपस्थितांनी मान देत शांतता राखली.पसार कारचालक व अपघाताचा सविस्तर तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत
                
आरवली ते तळे कंटे मृत्यूचा महामार्ग..

गेले तीन ते चार महिने अपघातांची शुरुंकला चालूच आहे. दोन दिवसांपूर्वी ही शास्त्रीफुल येथे अपघात झाला होता. आज परत अपघात झाला. त्यामुळे अपघाताची शृंखला चालू असल्याने संगमेश्वर आरवली ते तळेघंटे मृत्यूचा महामार्ग झाला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सदरचे अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर टप्पा क्रमांक सहा मध्ये अनेक जणांचे मृत्यू गेले पाच ते सहा वर्षांमध्ये झाले आहेत. दर दोन ते तीन दिवसांनी अपघात होतो. त्यामुळे कामाबद्दल व कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page